Recent Posts

ads
Responsive Ads Here

SBI Vacciencies


पदवीधरांसाठी खूशखबर! स्टेट बँकेत ८ हजार जागांसाठी भरती


मुंबई: आर्थिक मंदी आणि बेरोजगारीमुळं चिंतेत असलेल्या तरुणाईसाठी एक खूशखबर आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेत क्लर्क पदासाठी ८ हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. भरतीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारास अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक ८६५ जागा भरल्या जाणार आहेत. स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर २ जानेवारी रोजी याबाबत माहिती देण्यात आली असून अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकेतील कस्टमर सपोर्ट व सेल्स विभागासाठी कनिष्ठ साहाय्यक या पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२० आहे. याच कालावधीत अर्जदारांना नोंदणी शुल्क भरावं लागणार आहे. पात्र उमेदवारांना या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. एका उमेदवाराला एकाच राज्यात अर्ज करता येणार आहे. कधी होणार परीक्षा? प्राथमिक परीक्षा : फेब्रुवारी/मार्च २०२० मुख्य परीक्षा : १९ एप्रिल २०२० स्टेट बँक भरतीची ठळक वैशिष्ट्ये: रिक्त जागा देशभरात एकूण ८ हजार जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातून सर्वाधिक ८६५ जागा भरल्या जाणार आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश ५१०, छत्तीसगड १९०, दिल्ली १४३, राजस्थान ५००, बिहार २३०, झारखंडमध्ये ४५ व अन्य राज्यांतील रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्ज करू शकतो. पात्रतेचे निकष उमेदवारानं १ जानेवारी २०२० पूर्वी पूर्ण केलेले असावेत. त्यानंतरच्या उमेदवारांना संधी मिळणार नाही. वय:अर्जदाराचं किमान वय २० पूर्ण केलेलं असावं. तर, कमाल वय २८ वर्षे असावं. १ जानेवारी २०२० ही तारीख त्यासाठी आधार म्हणून धरली जाईल. म्हणजेच, २ जानेवारी १९९२ च्या आधी आणि १ जानेवारी २००० नंतर जन्मलेल्यांना अर्ज करता येणार नाही. एससी, एसटी उमेदवारांसाठी वयाची अट ५ वर्षांनी तर, ओबीसींसाठी तीन वर्षांनी शिथील करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment